व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या स्थितीच्या नियमाचे प्रारूप प्रसिद्ध

Promulgated Draft Rules for Occupational Safety, Health and Working Conditions

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या स्थितीच्या नियमाचे प्रारूप प्रसिद्ध

आक्षेप किंवा सूचना कळविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम 2022 चा मसुदा आणि महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कारखाने व इतर बंदरे) नियम, 2022 चा मसुदा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये दि. 18 जुलै 2022 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेल्या मसुद्यांबाबत 45 दिवसांच्या आत हरकती तसेच सूचना योग्य समर्थनासह मागविण्यात येत आहेत. मसुदा नियम हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ कायदे व नियम या पर्यायाखाली www.maharashtra.gov.in आणि https://mahakamgar.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम 2022 च्या कामगार नियम प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, 4 था मजला, सी 20, ई ब्लॉक, बांद्रा संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई 400051 यांच्याकडून किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कारखाने व इतर बंदरे) नियम, 2022 बाबतचे आक्षेप किंवा सूचना संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, 5 वा मजला, सी 20, ई ब्लॉक, वांद्रे संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई 400051 यांचे कडून किंवा dirdish.mum-mh@gov.in या ईमेलवर स्वीकारण्यात येणार आहेत.

कालावधी समाप्त होण्यापूर्वी प्रारुपांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संघटनेकडून प्राप्त होणारे असे आक्षेप किंवा सूचना, राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येतील, असे कामगार आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *