We should imbibe the Shiv philosophy of respecting and protecting women and mothers
परस्त्री, माता यांचा आदर व रक्षण करणे हा शिवविचार आपण आत्मसात केला पाहिजे
साधना विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर ,पुणे येथे शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्या मनीषा वाघमारे व हेमलता वाघमोडे,विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ माळवाडी परिसरातून शिवराय अभिवादन प्रभात फेरी जल्लोषात काढण्यात आली. लेझीम पथकाने प्रात्यक्षिके व शौर्याचे खेळ दाखवले.सभा कार्यक्रमात कारभारी देवकर यांनी महाराष्ट्र गीत तर चित्रा हेंद्रे यांनी पोवाडा व शिवरायांचा त्रिवार जयजयकार हे गीत सादर केले .
विद्यार्थी मनोगतात श्री काळे, शेख रुमाना, ओम काळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिक्षक मनोगतात ज्ञानेश्वर सरोदे यांनी शिवरायांच्या कार्याची माहिती सांगितली.
अध्यक्षीय भाषणात उपमुख्याध्यापिका योजना निकम म्हणाल्या शिवरायांच्या जयजयकारा बरोबरच शिवरायांच्या विचारांप्रमाणे आपण आचरण केले पाहिजे.पर स्त्री,माता यांचा आदर व रक्षण करणे हा शिवविचार आपण आत्मसात केला पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज हे थोर मातृभक्त होते.मातेचा आदर करून समाजासाठी काम केले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सरोदे व सविता पाषाणकर यांनी केले. तर आभार सचिन कुंभार यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com