Government’s emphasis on providing infrastructure such as roads, health facilities – Deepak Kesarkar
रस्ते, आरोग्य सुविधा अशा पायाभूत सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर
– दीपक केसरकर
मुंबई : रस्ते, आरोग्य सुविधा अशा पायाभूत सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर असून कोणाच्या विरोधात निवडणूक लढवायची आव्हानं देऊन वेळ वाया घालवण्यात आम्हाला रस नाही, असं मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायचं आव्हान दिलं होतं. त्याला केसरकर यांनी प्रत्त्युतर दिलं. मुंबईत शौचालयांची मोठी समस्या असल्यानं नागरी महामंडळातर्फे आता २० हजार शौचालयं आणि महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहं बांधली जाणार असल्याचं ते म्हणाले.
प्रामुख्यानं झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्याचा उपयोग होईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या नागरिकांना मोफत दवाखाने आणि आरोग्य सुविधा मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
या आधी महापालिकेत एक लॉबी होती जी दरवर्षी रस्ते बांधत होती, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे ते पुन्हा-पुन्हा बांधायची गरज निर्माण होत होती, असा आरोप केसरकर यांनी ठाकरे गटावर केला. ते ठेकेदारांचा विचार करायचे आम्ही लोकांचा विचार करतो, असं केसरकर यांनी सांगितलं. ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांच्या रूपाने एक चांगला माणूस गमावला आहे, असं केसरकर म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com