राज्य शासनाच्या सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर

Government of Maharashtra महाराष्ट्र शासन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Public holidays in 2023 Announced

राज्य शासनाच्या सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. यामध्येGovernment of Maharashtra महाराष्ट्र शासन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

  • प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार,
  • महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार,
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार,
  • होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार ,
  • गुढीपाडवा २२ मार्च बुधवार,
  • रामनवमी ३० मार्च गुरुवार,
  • महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार,
  • गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार,
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार,
  • महाराष्ट्र दिन १ मे सोमवार,
  • बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार,
  • बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार,
  • मोहरम २९ जुलै शनिवार,
  • स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार,
  • पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार,
  • गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार,
  • ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार,
  • महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार,
  • दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार,
  • दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार,
  • दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार,
  • गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार,
  • ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार

सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.

बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल २०२३ , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.

या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *