डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक क्रांती’ या ग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन

Publication of Dr. Babasaheb Ambedkar’s book ‘Social Revolution’ at the University

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक क्रांती’ या ग्रंथाचे २१ मे २०२२ रोजी विद्यापीठात प्रकाशन

पुणे : डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ६६ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक क्रांती या महत्वाच्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवार, दिनांक २१ मे २०२२ रोजी, सकाळी १०:३० वाजता मुख्य इमारत संत ज्ञानेश्वर सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न होणार आहे.

Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

माजी गृहमंत्री व काँग्रेस चे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. तसेच विधान परिषदेचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक योगदानावर समग्र अभ्यासातून निर्माण झालेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचा हा ग्रंथ आहे.

महाराष्ट्रातील अनेक नामवंत इतिहासकार, इतिहास अभ्यासक, विद्वान, लेखक, कवी , उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, रसिक, वाचक असे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास विशेष उपस्थित राहणार आहेत.

या महाग्रंथाची निर्मिती चेतक प्रकाशन, पुणे यांनी केली असून फुले शाहू आंबेडकर विचार मंडळ – भोर, फुले शाहू आंबेडकर शिक्षक, शिक्षकेतर संघ, फुले शाहू आंबेडकर विचार मंच – पुणे, डॉ. सुनिल धिवार, विठ्ठल गायकवाड, डॉ.आर.एस.पंडित, सतीश वाघमारे, संतोष मदने, डॉ. रोहिदास जाधव, दादासाहेब सोनवणे, महेश थोरवे, डॉ. मिलिंद निकाजे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे चे कार्याध्यक्ष सचिन ईटकर व आंतरराष्ट्रीय विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *