जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

State Election Commissioner. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

Publication of draft voter lists for Zilla Parishad and Panchayat Samiti elections on 18th July

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदारState Election Commission. राज्य निवडणूक आयोग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsयाद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील.

मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *