अपघात चाचणींवर आधारित स्वयंचलित वाहनांना तारांकित गुणांकन देण्याविषयाचा मसुदा प्रकाशित

Nitin Gadkari, Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Published a draft on giving a star ratings to automatic vehicles based on accident tests

अपघात चाचणींवर आधारित स्वयंचलित वाहनांना तारांकित गुणांकन देण्याविषयाचा मसुदा प्रकाशित

नवी दिल्ली :  भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत-नवीन कार मुल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे.

Nitin Gadkari- Hadapsar News
File Photo

भारत-एनसीएपी हे ग्राहक केंद्रित मंच म्हणून काम करेल, त्यामुळे ग्राहकांना गुणांकनाच्या आधारे सुरक्षित कारची निवड करता येईल आणि सुरक्षित वाहनं तयार करण्यासाठी भारतातल्या उपकरण निर्मात्यांच्या निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन मिळेल असं गडकरी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम हा भारतातल्या वाहन उद्योगाला जगात पहिल्या क्रमांकाचं ऑटोमोबाईल संकुल बनवण्याच्या उद्देशानं एक महत्वपूर्ण साधन असल्याचं सिद्ध होईल असंही गडकरी म्हणाले

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 24 जून  2022 रोजी  भारत एनसीएपी अर्थात नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाच्या संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये 126E अंतर्गत  काही नियमांचा  समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, यामध्ये खालील गोष्टी सुचवण्यात आल्या आहेत.

(a) देशात उत्पादित किंवा आयात केलेल्या 3.5 टन पेक्षा कमी वजन असलेल्या M1 श्रेणीच्या  मंजुरी प्राप्त  मोटार वाहनांना  [ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मोटार वाहने, ज्यामध्ये चालकाच्या आसना  व्यतिरिक्त आठ जागा आहेत], ज्यामध्ये  वाहन उद्योग मानके  (Automotive Industry Standard (AIS)-197 नुसार. वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत आणि जागतिक मानक बेंचमार्कप्रमाणे या वाहनांची रचना केली आहे जी  किमान नियामक आवश्यकतांपेक्षा अधिक  आहे, अशा सर्व वाहनांना लागू असेल.

(b) भारत एनसीएपी रेटिंग,  वाहनाचे मूल्यांकन करून ग्राहकांना मोटारीत बसणाऱ्यांसाठीच्या संरक्षणाच्या स्तराबाबत  (a) प्रौढ प्रवासी  संरक्षण (AOP) (b) बालक प्रवासी संरक्षण  (COP) आणि (c) संरक्षण सहाय्यक तंत्रज्ञान  (SAT) या  क्षेत्रात आवश्यक संकेत  देईल.  वाहन उद्योग मानके (Automotive Industry Standard )197 नुसार घेतलेल्या विविध चाचण्यांच्या स्कोअरच्या आधारे वाहनाला एक ते पाच पर्यंतचे स्टार रेटिंग दिले जाईल.

हा मूल्यांकन कार्यक्रम  प्रवासी गाडीच्या  सुरक्षा रेटिंगची संकल्पना मांडतो  आणि ग्राहकांना संपूर्ण माहितीच्या आधारे  निर्णय घेण्यास सक्षम  करतो . हे देशातील  OEM -original equipment manufacturer अर्थात उपकरणांच्या मूळ उत्पादक कंपन्यां द्वारे उत्पादित केलेल्या वाहनाच्या  निर्यात क्षमतेला  प्रोत्साहन देईल आणि देशांतर्गत ग्राहकांचा या वाहनांवरील विश्वास वृद्धिंगत होईल. याशिवाय हा कार्यक्रम उत्पादकांना उच्च रेटिंग मिळविण्यासाठी प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान प्रदान करण्यास प्रोत्साहित करेल.

(c) या कार्यक्रमांअंतर्गत वाहनांच्या चाचण्या ,  केंद्रीय मोटार वाहन नियम, (CMVR )1989 च्या नियम 126 मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पायाभूत सुविधांसह चाचणी एजन्सींमध्ये केल्या जातील.

(d) कार्यक्रम लागू होण्याची तारीख: १ एप्रिल २०२३.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *