Pune City Winner at C40 Cities Bloomberg Philanthropies Awards 2022
C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्डस २०२२ मध्ये पुणे शहर विजेते
हवा गुणवत्ता सुधारणेच्या पुण्याच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर गौरव
जगातील शंभर अग्रेसर शहरांच्या समुहाकडून पुरस्कार जाहीर
- अर्बन क्लायमेट अॅक्शन अंतर्गत शहरांसाठी दिला जाणारा पुरस्कार
- हरित भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या 10 शहरी प्रकल्पांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.
- विजेते शहर, हे ब्युनोस आइरेस, आर्जेंटीना येथे होणाऱ्या C40 वर्ल्ड महापौर समिट मध्ये जाहीर केले आहे.
पुणे : पुणे शहराला सन 2022 मध्ये C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्डसचे विजेते म्हणून जाहीर करण्यात आले. United To Clean The Air We Breathe या श्रेणीमध्ये, पुणे शहराने इलेक्ट्रिक बसेससाठी घेतलेला पुढाकार व सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषण मुक्त यंत्रणा वापरात असल्याबद्दल पुणे शहराला पुरस्कार जाहीर केला.
जागतिक तापमान वाढीवर विविध देशातील शहरांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची दखल घेत त्या शहरांचे महापौर / आयुक्त यांना खालील पाच श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले आहे. या वर्षाच्या समिटची थीम एकात्मिक कृती (United In Action) ही आहे.
हवामान बदलाच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद देत उपाययोजना करणाऱ्या जगातील जवळपास १०० अग्रेसर शहरांचा ‘सी-४०’ हा समूह कार्यरत आहे. या समुहामार्फत हवामान बदलाच्या समस्यावर उपाययोजनांसाठी विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करुन समुहात समाविष्ट शहरांना प्रोत्साहन दिले जाते. या समुहाने अर्जेंटिना देशातील ब्यूनास आयरेस शहरात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहराला ‘सी-४०’ सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्डस’चे विजेते म्हणून जाहीर केले आहे.
1. महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे त्वरित कार्यवाही करणे.
2. आपण श्वास घेत असलेल्या हवेला स्वच्छ करण्यासाठी एकत्रित येणे.
3. जागतिक वातावरण बदलावर मात करण्यासाठी एकत्रित येणे.
4. नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी एकत्रित येणे.
5. जागतिक वातावरण बदलाबद्दल चळवळ तयार करण्यासाठी एकत्रित येणे.
यावर्षीच्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी जगातील सत्तर (७०) शहरांनी स्पर्धेत भाग घेतला होता. या पुरस्कारांमुळे विविध शहरांनी पुढाकार घेऊन वातावरणबदला विरुद्ध लढा देण्यासाठी शहरानी केलेले उपाययोजनांचे मैत्रीपूर्ण स्पर्धांच्या स्वरुपात चयन करण्यात आले. अशा पुरस्कार कार्यक्रमांच्या मागील सात आवृत्यांनी जगातील सर्वात महत्वाकांक्षी हवामान प्रकल्पांपैकी काही चांगले प्रकल्प समोर आले आहे. उदा. मागील विजेत्यांमध्ये लंडन शहराने “24 तास अल्ट्रा लो इमिशन झोन” साठी पुरस्कार घेतला होता.
श्री. सादिक खान, चेअरमन C40 सिटीज व लंडनचे महापौर म्हणाले: “C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्डसच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन, हवामान बदल या विषयावर काम करण्यासाठी शहराची भूमिका महत्वाची असते. ही शहरे जगभरातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांचे प्रतिनिधीत्व करतात. शहराची भूमिका त्यांनी केलेल्या कृती मधून दिसून येते व काही चांगल्या प्रकल्पांमुळे एका शहराने केलेले चांगले काम जगभरातील नेत्यांना हरित भविष्यात गुंतवणूक करण्यास प्रेरित करेल.”
मायकेल आर. ब्लूमबर्ग, C40 चे अध्यक्ष, UN च्या स्पेशल एन्वाय ओन क्लायमेट अम्बिशन ॲन्ड सोल्युशन्स, C40 बोर्डचे राष्ट्पती, न्यूयॉर्क शहराचे 108 वे महापौर आणि ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीजचे संस्थापक, म्हणाले: “जगभरातील, महापौर आणि शहरे, वातावरण बदल लढ्यावर रणनीती समाईक करण्यासाठी, महत्वाकांक्षी उद्धिष्ट निश्चित करण्यासाठी आणि हवामान बदलाच्या विरोधातील लढ्यामध्ये आवश्यक असलेला परिणाम मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. C40 सिटीज, ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्डसच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर वातवरण बदल संबंधी केलेल्या कामांची प्रात्यक्षिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्शविण्याची संधी मिळाली आहे, व यापुढे भविष्यात होणाऱ्या COP27 मध्ये सुध्दा संधी मिळण्याची शक्यता आहे”.
“क्लिन एअर वुई ब्रेथ या श्रेणी अंतर्गत C40 पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल आम्हाला आनंद झाला आहे. शहरी मोबिलिटी मधील डिकार्बनाइझिंग करीता आम्ही केलेल्या आमच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यामातून इतर शहरांसाठी एक चांगले उदाहरण ठेवता येईल व शहरे कार्बन मुक्त करण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीला कशा प्रकारे शाश्वत बनविता येईल याची दिशा ठरेल”.
श्री. विक्रम कुमार, महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका
सन २०२२ मध्ये पुणे शहराला प्राप्त झालेल्या या पुरस्कारातून क्लायमेट ॲक्शन बद्दल शहराने अवलंबलेल्या स्मार्ट, क्रिएटिव्ह योजना यांचे एक उदाहरण जगातील इतर शहरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. पुणे शहराने नाविन्यपूर्ण सर्वसमावेशक व रिझिलियन्स भविष्यासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे व यासाठी पुणे शहराकडे एक चम्पियन म्हणून बघितले जात आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com