“पुणे प्लॉगेथॉन २०२२ : मेगा ड्राईव्ह” च्या जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे आयोजन

A cycle rally on 29th May 2022 through Pune Municipal Corporation Cycle Club for public awareness of “Pune Plugathon 2022: Mega Drive”.

पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या माध्यमातून दिनांक २९ मे २०२२ रोजी “पुणे प्लॉगेथॉन २०२२ : मेगा ड्राईव्ह” च्या जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे आयोजन.

पुणे : नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने प्लॉगेथॉन हा एक स्तुत्य उपक्रम असून या वर्षी “पुणे प्लॉगेथॉन २०२२ : मेगा ड्राईव्ह” चे आयोजन दिनांक ५ जून २०२२ रोजी करण्यात येणार आहे.“पुणे प्लॉगेथॉन २०२२ : मेगा ड्राईव्ह” Pune Plugathon 2022-Mega Drive हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

यामध्ये पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिक, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, शाळा-महाविद्यालये, उद्याने यांचा सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे नियोजन घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरु आहे. “पुणे प्लॉगेथॉन २०२२ : मेगा ड्राईव्ह” साठी पुणे शहरातील एकूण १३४ रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर विविध टेकड्या रामनदी, पुणे शहरातील विविध नदी घाट व क्रॉनिक्स स्पॉट या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे.

सदर अभियानात पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, महाविद्यालये, NSS, NCC, पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित, नेहरू युवा केंद्र, समग्र नदी परिवार व अशा अनेक संस्था सहभागी होणार आहेत.

या ड्राईव्हचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व या प्लॉगेथॉन ड्राईव्हमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होणेसाठी मा महापालिका आयुक्त व प्रशासक श्री विक्रमकुमार यांचे मार्गदर्शनाने पुणे महानगरपालिके मार्फत दिनांक २९ मे २०२२ रोजी जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

पुणे महानगरपालिका सायकल क्लब व पुण्यातील सायकल क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने पर्यावरण, ध्वनी व वायू प्रदूषण, आरोग्य, वाहतूक नियमांचे पालन करणे, स्वच्छ सर्वेक्षण, जागतिक लोकसंख्या दिन, सायकल चालवा पर्यावरण वाचवा इ. विषयांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली .

या सायकल रॅलीच्या माध्यमातून शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्यात आला . या सायकल सायकल रॅलीचा शुभारंभ मा अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ कुणाल खेमनार, डॉ रवींद्र बिनवाडे, श्री. विलास कानडे व उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन तथा समन्वयक स्वच्छ भारत अभियान,श्रीमती आशा राऊत यांच्या शुभहस्ते दिनांक २९ मे २०२२ रोजी स.७.३० वाजता करण्यात आला.

सदर रॅली पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथून सुरु होऊन मॉर्डन कॅफे – जंगली महाराज रस्ता – अलका टॉकिज –टिळक रोड – पुराम चौक – बाजीराव रस्ता – शनिवार वाडा – पुणे महानगरपालिका या मार्गे समाप्त झाला . यामध्ये 300 हून जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते .

या सायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते…या आवाहनाला उत्तम प्रतिसाद लाभला.. सर्व पुणेकर नागरिकांनी दि.५ जून २०२२ च्या प्लॉगथॉन मेगाड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले .

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *