3 persons arrested in connection with Pune’s Seva Vikas Sahakari Bank scam
पुण्याच्या सेवा विकास सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ३ जणांना अटक
अटक झालेल्यात बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांचा निकटवर्ती बबलू सोनकर आणि अन्य दोघे ईडी कार्यालयातले कर्मचारी
पुणे: पुण्याच्या सेवा विकास सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ३ जणांना अटक केली आहे. बँकेने दाखल केलेल्या तक्रारी आणि सार्वजनिक पैशांची अफरातफर झाल्याचा सहकारी संस्था निबंधकांचा लेखापरीक्षणातला शेरा या दोन एफ आय आरच्या आधारे संचालनालयाने ही कारवाई सुरु केली आहे.
अटक झालेल्यात बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांचा निकटवर्ती बबलू सोनकर याचा समावेश आहे. अन्य दोघे ईडी कार्यालयातले कर्मचारी आहेत. बँकेची ९२ टक्क्याहून जास्त कर्जं बुडित खात्यात असून बँक दिवाळखोरीत निघाली आहे.
ही सहकारी बँक कोणत्याही विवेकी आर्थिक नियमांचे पालन न करता कौटुंबिक मालकीप्रमाणे चालवली जात होती आणि कोणत्याही व्यवहार्य सुरक्षेशिवाय कर्ज मंजूर केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
रिझर्व्ह बँकेनं सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना ऑक्टोबर २०२२ मध्ये रद्द केला होता. तेव्हा पासून बँकेला कुठलेही व्यवहार करता येत नव्हते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com