Puri-Ganga Sagar Divya Kashi Yatra to start from Pune on 28 April 2023
पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रेचा पुण्याहून येत्या 28 एप्रिल 2023 रोजी प्रारंभ
भारतीय रेल्वे पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेचा पुण्याहून येत्या 28 एप्रिल 2023 रोजी करणार प्रारं
पुणे : भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या पर्यटनविषयक संकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि भारत हे आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत स्तरावर उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे हे प्रत्यक्षात उतरवण्याच्या हेतूने रेल्वे मंत्रालयामार्फत देशाच्या विविध भागातून भारत गौरव पर्यटन रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत .
या संकल्पनाधारित रेल्वे गाड्या चालवण्या मागचा मूळ उद्देश भारताची समृद्ध संस्कृती आणि धार्मिक वारसा देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमोर सादर करणे या संकल्पनेवर आधारित आहे.
भारतीय रेल्वेने 28 एप्रिल 2023 ला पुण्याहून पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रेला सुरुवात करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. सनातन धर्म यात्रेकरूंना घेऊन पुण्याहून सुटणाऱ्या या गाडीचं संपूर्णतः आरक्षण झालं आहे. दहा दिवस आणि नऊ रात्रीच्या या यात्रेत पर्यटकांना पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज इथल्या महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळांना भेट देता येणार असून यात पर्यटकांना जगन्नाथ पुरी मंदिर, कोणार्क मंदिर, पुरी इथलं लिंगराज मंदिर, कोलकात्याचं काली बाडी आणि गंगासागर, गया इथलं विष्णुपद मंदिर आणि बोधगया, वाराणसी इथलं काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा घाट तसंच प्रयागराज इथला त्रिवेणी संगम यासारखी अत्यंत प्रसिद्ध मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळांचं दर्शन घेता येणार आहे.
अत्यंत व्यावसायिक म्हणून परिचित असलेला आय आर सी टी सी या रेल्वेच्या आदरातिथ्य विभागाने या सर्वसमावेशक यात्रेच आयोजन केलं आहे.
भारत गौरव रेल्वे गाडीच्याअत्याधुनिक एल एच बी रेल्वे डब्यामधून अत्यंत आरामदायी रेल्वे प्रवास होणार असून रेल्वे गाड्यांमध्ये आणि गाड्या बाहेरील भोजन व्यवस्था, उत्कृष्ट प्रमाणित बस सेवांच्या माध्यमातून रस्ते वाहतूक आणि प्रेक्षणीय स्थळांचा दर्शन आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार राहण्याची चोख व्यवस्था, सुरक्षित प्रवास, प्रवासी विमा, रेल्वे गाड्या अंतर्गत सुरक्षा आणि रेल्वे प्रवासा अंतर्गत पर्यटकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमासह इतर सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
पर्यटकांना रेल्वेचा जास्तीत जास्त प्रवास करण्यासाठी टूरची किंमत आकर्षक आहे. सनातन धर्माच्या अनुयायांचे एका सुंदर अध्यात्मिक प्रवासावर जाण्यासाठी आणि धार्मिकतेच्या आणि धार्मिकतेच्या मार्गावर स्वतःला पुन्हा शोधून काढण्यासाठी रेल्वेने सर्व तयारी केली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com