संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Parliament House New Delhi संसद भवन नवी दिल्ली हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Adjournment of both Houses of Parliament for the day due to Rahul Gandhi’s statement and Adani case issues

राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी प्रकरणाच्या मुद्द्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी प्रकरणाच्या मुद्द्यांवरुन झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Hadapsar News, Hadapsar Latest News, हडपसर मराठी बातम्या
File Photo

नवी दिल्ली : राहुल गांधी यांचं भारतीय लोकशाहीबद्दलचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात घोषणाबाजी चालू राहिल्याने कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

लोकसभेत आज सकाळी सुरुवातीलाच काँग्रेस, द्रमुक राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देऊ लागले. सभापती ओम बिरला यांनी सदस्यांना जागेवर जायला सांगितलं मात्र गदारोळ थांबला नाही त्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

दोन नंतरही सभागृहात गोंधळ कायम राहिला. विरोधकांचे स्थगनप्रस्ताव सभापतींनी फेटाळले असल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगूनही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणा थांबवल्या नाही.

जम्मू आणि कश्मीर केंद्रशासित प्रदेशाचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आणि चालू आर्थिक वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या तसंच विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं.

राज्यसभेतही हीच परिस्थिती होती. अदानी समूह प्रकरणासंदर्भात विरोधी पक्ष सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. सदस्यांनी सभागृहाच्या शिस्तीचं पालन करावं आणि विधायक चर्चेत सहभागी व्हावं असं त्यांनी सांगितलं.

सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राहुल गांधींकडून माफीची मागणी करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमआदमी पक्ष, डावे पक्ष सदस्य अदानी प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या घोषणा देऊ लागले. शेवटी सभागृहातल्या सर्व गटनेत्यांची बैठक घेण्याचं अध्यक्ष धनखड यांनी जाहीर केलं, आणि कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

राहुल गांधी राज्यसभेचे सदस्य नाहीत त्यामुळे त्यांनी तिथे माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यांनी सांगितलं. मात्र दोन्ही बाजूंनी घोषणा चालूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

गुढीपाडवा, चैती चांद, चैत्र शुक्लादि, युगादि हे सण उद्या देशभरात साजरे होणार असून सार्वजनिक सुट्टी असल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार नाही. आता सभागृह येत्या गुरुवारी 23 मार्चला भरतील.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *