शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी, शंका विद्यापीठाकडे मांडा

Raise the difficulties, and doubts in the implementation of the educational policy in the university

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी, शंका विद्यापीठाकडे मांडा : प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला दोन वर्ष पूर्ण

पुणे : शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे कशी करावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग सातत्याने परिपत्रक काढत आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासाठी समिती नेमली आहे, त्यामुळेच महाविद्यालयांनी आपल्या शंका,. सूचना विद्यापीठाकडे मांडाव्यात जेणेकरून अधिक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक धोरण २०२० ची अंमबजावणी केली जाईल असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी केले.

Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन वर्षापूर्वी २९ जुलै २०२० रोजी देशभर लागू झाले. या दिवसाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.संजीव सोनवणे बोलत होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ अंमलबावणी समितीचे अध्यक्ष व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, समिती सदस्य राजीव साबडे व डॉ. संजय चाकणे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी डॉ.सोनवणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील प्रचन पद्धत, शोधन पद्धत, कृतन पद्धत आदी बाबींबाबत सविस्तर माहिती दिली. ४ वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असणार याबाबतही सांगितले. अनुभवात्मक शिक्षणाचे महत्व आणि त्याची गरज त्यांनी उदाहरण देत विस्तृत केली.

यावेळी राजेश पांडे म्हणाले, महाविद्यालयांनी हे शैक्षणिक धोरण सकारात्मकतेने घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा पुढील काळात सर्वच असंबद्ध (irrelavant) होईल. या धोरणाने सर्व आकाश विद्यार्थ्यांसाठी खुलं करून दिलं आहे, हवं ते शिकण्याची मुभा दिली आहे आणि शिक्षणात मोठं परिवर्तन घडवलं आहे. आपण सर्वजण या परिवर्तनाचे साक्षीदार होऊया.

तर डॉ. चाकणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील सर्वसमावेशक शिक्षण, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स याबाबत सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विभागप्रमुख तसेच महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *