Raisina dialogue begins in New Delhi
रायसिना संवादाला नवी दिल्लीत प्रारंभ
नवी दिल्ली : नवी दिल्ली इथं आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रायसिना संवादाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा ऊर्सुला वोन डेर लेएन यांनी उद्धाटनाच्या सत्राला संबोधित केलं.
भारत आणि युरोपिय संघ यांची मूलभूत तत्वं आणि हितसंबध समान आहेत, प्रत्येक देशाला आपलं भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे, यावर आमचा विश्वास आहे. कायद्याचं राज्य आणि मूलभूत हक्कांवर आमचा विश्वास आहे. लोकशाही हीच, नागरिकांसाठी सर्वात चांगली शासनव्यवस्था आहे, यावर आमचा विश्वास आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.
लेयन पुढे म्हणाल्या दर पाच वर्षांनी भारतीय नागरिक संसदीय निवडणुकीत मतदान करतात. तेव्हा संपूर्ण जग त्याकडे आदरानं पाहतं, कारण जगातील सर्वात मोठी लोकशाही आपला भविष्याचा मार्ग ठरवत असते. १३० कोटी लोकांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम जगावर होत असतात.
युरोपियन युनियनची भारतासोबतची भागीदारी बळकट करणं, हेच आमचे प्राधान्य आहे यावर त्यांनी जोर दिला.
हडपसर न्युज ब्युरो.