राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान सोहळा बुधवार 29 मार्च ला

Bhajan Samrat Anup Jalota भजन सम्राट अनुप जलोटा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Ram Kadam Kala Gaurav award distribution ceremony on Wednesday

राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी

अनुप जलोटा, जावेद अली यांचा होणार सन्मानBhajan Samrat Anup Jalota भजन सम्राट अनुप जलोटा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

पुणे : रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान सोहळा बुधवार, दि. 29 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

यंदाच्या वर्षी भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा आणि प्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अली यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून पुरस्कार वितरण पद्मविभूषण डॉ. शरद पवार आणि सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवेदनाद्वारे दिली.

प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे 14वे वर्ष आहे.

पुरस्कार वितरण सोहळा आणि स्व. राम कदम यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे सायंकाळी 5 ते 8:30 या वेळात आयोजित करण्यात आला असून पुरस्कार वितरण सायंकाळी 6 ते 7 या वेळात होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निरूपणकार उल्हास पवार आहेत. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, आमदार रवींद्र धंगेकर, धारिवाल इंडस्ट्रिजचे एम. डी. प्रकाश धारिवाल, सुहाना-प्रविण मसालेवाले उद्योगाचे एम. डी. विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राकेश सांकला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार विरेंद्र लाटकर (नागपूर) आणि राकेश खराडे (पनवेल) यांना शरद पवार यांच्या हस्ते या प्रसंगी प्रदान केला जाणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त राम कदम यांनी संगीत दिलेली गीते नंदेश उमप, संदीप उबाळे, श्रद्धा जोशी, सावनी सावकर, एवंत सुराणा सादर करणार असून अमृता केदार, मुकेश देढीया, अजय अत्रे, राजेंद्र दूरकर, मिहिर भडकमकर, पद्माकर गुजर, राजेंद्र साळुंखे साथसंगत करणार आहेत. निवेदन रवींद्र खरे यांचे आहे.

भजन सम्राट अनुप जलोटा

ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि अभिनेता अशी अनुप जलोटा यांची ओळख आहे. संगीत क्षेत्रात भजन प्रकारातील योगदानामुळे ते भजन सम्राट म्हणून नावलौकिकप्राप्त आहेत. कला प्रकारातील योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारने 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अनुप जलोटा यांचा जन्म नैनिताल (उत्तराखंड) येथील आहे. त्यांचे वडिल पुरुषोत्तमदास जलोटा हे प्रख्यात भजन गायक होते. अनुप जलोटा यांचे सांगीतिक शिक्षण लखनौच्या भातखंडे संगीत संस्थेत झाले असून त्यांची संगीत कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीमध्ये गायक म्हणून झाली. ‘ऐसी लागी लगन’, ‘मैं नही माखन खायो’, ‘रंग दे चुनरिया’, ‘जग मे सुंदर है दो नाम’, ‘चदरिया झिनी रे झिनी’, ‘तुम चंदन हम पानी’ या त्यांच्या आवजातील रचना प्रसिद्ध आहेत.

प्रसिद्ध युवा गायक जावेद अली

युवा पिढीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अली यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांचे वडिल उस्ताद हमिद हुसेन हे लोकप्रिय कव्वाली गायक असल्याने जावेद यांची गायनाची तालिम बालवयातच सुरू झाली. जगप्रसिद्ध गझल गायक उस्ताद गुलाम अली यांचे जावेद यांना मार्गदर्शन लाभले आहे.

उस्ताद गुलाम अली यांना श्रद्धांजली व त्यांचा सन्मान म्हणून जावेद यांनी आपले नाव जावेद हुसेन यावरून जावेद अली असे बदलले. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम्‌‍, गुजराथी, मराठी, उडिया, तमिळ, उर्दू, तेलगु अशा विविध भाषांमधील चित्रपटांसाठी जावेद यांनी पार्श्वगायन केले आहे. तसेच कव्वाली गायक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ‘श्रीवल्ली’, ‘एक दिन तेरी राहों में’, ‘जश्न-ए-बहारन’, ‘अर्जियां’ ‘गुजारिश’, ‘आ जाओ मेरी तमन्ना’ ही त्यांच्या आवाजातील चित्रपट गीते गाजली आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *