RBI has imposed a fine of Rs.1 Crore, Seventy Lakhs on Vakrangi Sanstha
आरबीआय ने वक्रंगी संस्थेला ठोठावला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड
मुंबई : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स कायद्याच्या, २००७ च्या कलम ३० अंतर्गत आरबीआयमध्ये विहित अधिकारांचा वापर करताना हा दंड ठोठावण्यात आला आहे.
हा निर्णय नियामक अनुपालनात असलेल्या कमतरतेसाठी घेण्यात आला असून संस्थेने तिच्या ग्राहकांसह केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर आक्षेप घेण्याचा हेतू नसल्याचं आरबीआय ने म्हटले आहे.
असे आढळून आले की व्हाईट लेबल एटीएमच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे संस्था पालन करत नाही. त्यानुसार, निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का आकारू नये, याची कारणे दाखवा, देणारी नोटीस संस्थेला बजावण्यात आली.
वैयक्तिक सुनावणीदरम्यान संस्थेच्या प्रतिसादांचा आणि तोंडी सबमिशनचा विचार केल्यानंतर, RBI ने निष्कर्ष काढला की RBI निर्देशांचे पालन न केल्याचा वरील आरोप सिद्ध झाला आणि आर्थिक दंड ठोठावण्यात आला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com