Reserve Bank has imposed restrictions on 4 co-operative banks in view of the deteriorating financial condition
खालवलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ४ सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध
नवी दिल्ली : रिझव्र्ह बँकेनं चार सहकारी बँकांची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत.
या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,सूरी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील दोन बँका, युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बिजनौर आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बहराइच यांचा समावेश आहे.
साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार २० हजार रुपये तर द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ठेवीदार ५० हजारापेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत.
नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत, पैसे काढण्याची मर्यादा प्रति ग्राहक १० हजार रुपये ठेवण्यात आली असून युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बिजनौरवर पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ अंतर्गत या चार सहकारी बँकांना आरबीआयने जारी केलेले निर्देश सहा महिन्यांसाठी लागू राहतील.
या संदर्भात आरबीआयच्या प्रेस रिलीझनुसार, बँका, आरबीआयच्या लेखी मंजूरीशिवाय, कोणतेही कर्ज आणि अग्रिम मंजूर किंवा नूतनीकरण करणार नाहीत, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाहीत, निधीची उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे, वितरण किंवा कोणतीही देयके आणि दायित्वे पूर्ण करताना किंवा अन्यथा, कोणतीही तडजोड किंवा व्यवस्थेत प्रवेश करणे आणि आरबीआय निर्देशांमध्ये सूचित केल्याशिवाय कोणत्याही मालमत्ता किंवा मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाट लावण्यास सहमत आहे.
हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की आरबीआयने दिलेल्या निर्देशांचा अर्थ आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला आहे असे समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार करू शकते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com