RBI instructs to provide ATM card withdrawal facility
एटीएममध्ये कार्डाशिवाय पैसे काढण्याची सुविधा प्रदान करण्याचे आर बी आयचे निर्देश
नवी दिल्ली : आर बी आय, अर्थात भारतीय रिझर्व बँकेनं सर्व बँकांना एटीएममध्ये कार्डाशिवाय पैसे काढण्याची सुविधा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.
फसवणूकीला आळा घालण्यासाठी गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना एटीएममधून कार्ड-शिवाय पैसे काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
मात्र सध्या काही बँकांद्वारेच ही सुविधा दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल एका परीपत्रकाद्वारे आर बी आयनं हा आदेश दिला आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कसह युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस जोडण्याचा सल्ला देण्यात आल्याचंही बँकेनं म्हटलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो
नवी दिल्ली