The Reserve Bank of India raised the repo rate by 40 basis points to 4.4%.
रिझर्व्ह बँकेकडून अचानक व्याजदरात ४ दशांश टक्के वाढ
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी अचानक व्याजदरात ४ दशांश टक्के वाढ केली आहे. दुपारी प्रसारित केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली.
त्यामुळं रेपो दर ४ टक्क्यांवरुन ४ पूर्णांक ४ टक्के झाला आहे. यासोबतच स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट आणि बँक दरही ४ दशांश टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळं हे दर ४ पूर्णांक १५ दशांश टक्के, ४ पूर्णांक ६५ दशांश आणि ४ पूर्णांक ६५ दशांश टक्के झाले आहे. तत्काळ प्रभावाने ही दरवाढ लागू होणार आहे.
रेपो दरात शेवटची कपात मे 2020 मध्ये करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तसाच ठेवण्यात आला होता. ही दरवाढ तात्काळ लागू होणार आहे. पुढे, कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये 50 bps ने वाढ करण्यात आली आहे.
परिणामी विविध कर्ज आणि ठेवींवर सर्वसामान्यांना अधिक व्याज द्यावे लागण्याची शक्यता आहे. जगासह देशातही महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तरीही गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पतधोरण आढावा समितीनं अचानकपणे २ आणि ४ मे रोजी बैठक घेण्याचा निर्णय घेतला.
महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी व्याजदर वाढीचा हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. जगातल्या काही देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळं आणि निर्बंधांमुळं पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम देशातल्या महागाई दरावर होऊ शकतो, अशी शक्यताही दास यांनी व्यक्त केली आहे.
रेपो रेट म्हणजे काय आणि ते का महत्वाचे आहे
प्रत्येक वेळी व्यापारी बँकांकडे निधीची कमतरता भासते, तेव्हा ते पैसे कर्ज घेण्यासाठी आरबीआयकडे जातात. RBI या बँकांना विशिष्ट दराने कर्ज देते ज्याला रेपो दर म्हणतात. दर वाढवायचे/कपात करायचे की ते अपरिवर्तित करायचे हे RBI वेळोवेळी ठरवते. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेतील तरलता आणि चलनवाढीवर परिणाम होऊ शकतो.
हडपसर न्यूज ब्युरो