बंडखोर आमदार मुंबईत परतल्यावर बदलतील असा शरद पवार यांना विश्वास

harad Pawar . हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

बंडखोर आमदार मुंबईत परतल्यावर बदलतील असा शरद पवार यांना विश्वास

harad Pawar . हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.
File Photo

नवी दिल्ली : शिवसेनेचे बंडखोर आमदार परत येतील, मुंबईत परतल्यानंतर त्यांची भूमिका बदलेल, अशा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते. या आमदारांना परत आणण्यासाठी लवकरच पावलं उचलली जातील, असं ते म्हणाले.

महविकास आघाडी कायम ठेवण्याची आमची इच्छा असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता कमी आहे, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांतर्फे यशवंत सिन्हा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती पवार यांनी दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *