पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू

Animal Husbandry Minister and Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil पशुसंवर्धन मंत्री,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Recruitment process for various 446 posts in animal husbandry department started

पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू

Animal Husbandry Minister and Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil पशुसंवर्धन मंत्री,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुंबई : पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेऊन तेव्हाच भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं जाहीर केलं होतं, असं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

यामध्ये पशुधन पर्यवेक्षकाची ३७६ पदं, वरिष्ठ लिपीकाची ४४ पदं, लघुलेखक- उच्चश्रेणीची २ पदं, लघुलेखक -निम्नश्रेणीची १३ पदं, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ४ पदं, तारतंत्रीची ३ पदं, यांत्रिकीची २ पदं,

बाष्पक परिचरची २ पदं अशी एकूण ४४६ पदं भरली जाणार आहेत.

यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (www.ahd.maharashtra.gov.in) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *