पुढील २ दिवसात कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर Heavy rains in many places in the state हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Red alert  in Konkan, Pune and East Vidarbha for the next 2 days

पुढील २ दिवसात कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात  रेड अलर्ट

मुंबई : राज्याच्या अनेक भागात काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा, तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. Rain with gale force winds at many places in the state राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व आणि पश्चिम विदर्भासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, त्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

12 ऑगस्टनंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि IMD ने म्हटले आहे की राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

आयएमडीने मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ही जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, तर वेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मंगळवारी सकाळी मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

पालघर, दक्षिण. कोकण, पुणे, आणि पूर्व विदर्भात आज रेड अॅलर्ट आज केला आहे. तर, मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भच्या काही भागात ऑरेंज‌ अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत काल रात्रीपासून १२३ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद सांताक्रझ वेधशाळेनं केली आहे. महाबळेश्वरला १९२ मिलीमीटर, तर रत्नागिरीत १३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्यानं नदी, नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आरमोरी तालुक्यात सर्वाधिक ९४, तर त्याखालोखाल मुलचेरा तालुक्यात ८८ पूर्णांक ६ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाचा जोर रविवारपासून वाढला आहे. अप्पर वर्धा आणि इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या होणाऱ्या पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे वर्धा, वैनगंगा, शिरणा या नद्या, नाले दुथडी भरून वाहात आहेत.

घरे, शेतं पाण्याखाली गेली आहे आहेत. जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. बोटीच्या सहाय्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. सध्या कुठंही जिवीत हानी नाही. मात्र, काही घरांची पडझड झाल्याचं वृत्त येत आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

सांगली जिल्ह्यात वारणा धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि जोरदार पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. वाळवा येथील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून सांगली- कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठच्या शेतात पाणी शिरू लागलं आहे. त्यामुळे ग्रामस्थाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.गगनबावडा-कोल्हापूर रस्त्यावर तीन ठिकाणी पाणी आलेलं आहे. धरण क्षेत्रात संततधार सुरू असून राधानगरी धरण ९५ टक्के भरले आहे, १ हजार ६०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आजरा तालुक्यातलं चित्री धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सांडव्यावरून ११० क्यसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज दिवसभर रिमझिम पाऊस सुरु आहे. अक्कलकोट तालुक्यात हरणा नदी काठावर असलेल्या पितापूर गावात मृत्यु झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जीव धोक्यात घालत पुराचं पाणी ओलांडून अंत्यविधी उरकण्याची वेळ आज आली.

पुणे जिल्ह्यातलं वीर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून संध्याकाळी ४ पासून १५ हजार ११ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. त्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहत असलेल्या नीरा नदीपात्रात नागरिकांनी उतरु नये, तसंच काठावर असलेल्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे..

हिंगोली जिल्ह्यात, इसापूर धऱण परिसर आणि पाणलोट क्षेत्रात पावसामुळं पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे १३ दरवाजे उघडले आहेत. धरणाचं पाणी पैनगंगा नदीत सोडलं आहे. पैनगंगा नदीवरच्या शिऊर पुलावरुन पाणी वाहत असल्यानं, विदर्भ- मराठवाड्याला जोडणार शेंबाळ पिंपरी ते कळमनूरी हा मार्ग आज सकाळी बंद झाला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *