The state cabinet meeting decided to reduce the price of petrol by Rs 5 and diesel by Rs 3
पेट्रोलच्या दरात पाच आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर कपातीचा निर्णय आज ( १४ जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल.
केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर आणि 22 मे रोजी व्हॅट कमी केला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यांना तसे करण्याचे आवाहन केले होते. मात्र, यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्राने केलेल्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. आम्ही आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.
या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोजा पडणार आहे
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com