Reduction in court cases due to repeal of outdated laws
कालबाह्य कायदे रद्द केल्यामुळे न्यायालयातल्या प्रकरणांमधे घट
कालबाह्य कायदे रद्द केल्यामुळे न्यायालयातल्या प्रकरणांमधे घट झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
आसाम पोलिसांनी तयार केलेल्या ‘आसाम कॉप’ या मोबाईल ऍप्लिकेशनचा केला प्रारंभ
“गुवाहाटी उच्च न्यायालयाचा स्वतःचा वारसा आणि ओळख आहे”
गुवाहाटी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटीमधील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आसाम पोलिसांनी तयार केलेल्या ‘आसाम कॉप’ या मोबाईल ऍप्लिकेशनचा देखील प्रारंभ केला. या ऍपमुळे गुन्हे आणि गुन्हेगारी जाळ्याचा मागोवा घेणारी प्रणाली(CCTNS) आणि वाहन राष्ट्रीय नोंदणीपुस्तिका यामधील माहिती आणि आकडेवारीच्या आधारे गुन्हेगार आणि वाहनांचा शोध घेता येईल.
कालबाह्य कायदे रद्द केल्यामुळे न्यायालयातल्या प्रकरणांमधे घट झाली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृतमहोत्सवाच्या समारोप सोहळ्यात आज ते बोलत होते. सरकारने असे सुमारे दोन हजार कायदे रद्द केले आहेत, असं ते म्हणाले.
देशातील न्याय वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाला अमर्याद वाव असल्याचे आपल्याला वाटते असे पंतप्रधान म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीच्या कार्याचे कौतुक करताना, पंतप्रधानांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित केलेल्या ई- न्यायालय मिशनच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल कार्यक्रमातील उपस्थितांना सांगितले.
न्यायिक व्यवस्थेत कार्यक्षमता आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या जागतिक प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. “कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सामान्य नागरिकांसाठी न्याय सुलभता सुधारण्यासाठीचे प्रयत्न वाढवले पाहिजेत”, असे पंतप्रधान म्हणाले.
सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत कायदे लिहिले जाण्याचं महत्त्व त्यांनी विशद केलं. सरकारी योजनांच्या प्रसारात तंत्रज्ञानाने महत्तवाची भूमिका बजावली असून न्यायालयीन कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फायदेशीर ठरेल असं ते म्हणाले. आसाम आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com