Voting on January 8 for Thirteen Seats of the representatives of the teacher’s group
अधिसभेच्या अध्यापकांच्या तेरा जागांसाठी ८ जानेवारी रोजी मतदान
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर प्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या अंतर्गत विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापक प्रतिनिधी म्हणून निवडून देण्यासाठी तसेच अभ्यास मंडळ व विद्या परिषदेवर प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ८ जानेवारी २०२३ रोजी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रफुल्ल पवार यांनी दिली.
विद्यापीठाकडून काहीच दिवसांपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडत पदवीधर मतदारांमधून दहा सदस्यांची नेमणूक नियुक्ती केली आहे. तसेच संस्थाचालकांचे प्रतिनिधी देखील बिनविरोध अधिसभेवर निवडून आले आहे. आता अध्यापक गटातील प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये महाविद्यालय/परिसंस्थेतील दहा अध्यापक आणि विद्यापीठातून तीन अध्यापकांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्याशाखेचे दोन अध्यापक यांची विद्यापरिषदेवर व महाविद्यालयातील तीन विभागप्रमुख प्रत्येक अभ्यास मंडळावर निवडून देण्यात येणार आहे.
डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, या जागांसाठी आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी यासाठी मतदान होणार आहे. यासाठीची तयारी झाली असून पदवीधर प्रमाणेच याही निवडणुका शांततेत पार पडतील यात शंका नाही.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com