Restrictions by RBI on operations of Nashik Zilla Girna Co-operative Bank and Raigad Co-operative Bank
नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक आणि रायगड सहकारी बँकेच्या कामकाजावर रिझर्व बँकेकडून निर्बंध
मुंबई : रिझर्व बँकेनं नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक आणि रायगड सहकारी बँक या दोन बँकांच्या कामकाजावर निर्बंध आणले आहेत. हे निर्बंध 18 जुलैपासून अमलात आले आहेत.
या निर्बंधांमुळे या दोन्ही बँकाना रिझर्व बँकेच्या लेखी परवानगीशिवाय कर्ज देता येणार नाही, ठेवी स्वीकारता येणार नाहीत, कर्ज किंवा ठेवींचं नुतनीकरणही करता येणार नाही, तसंच बँकेची मालमत्ता विकता किंवा गहाण ठेवता येणार नाही.
यापैकी नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेच्या ठेवीदारांना आपल्या खात्यातून रक्कम काढता येणार नाही, मात्र या बँकेचे 99 टक्क्यांहून जास्त ठेवीदार विमा संरक्षण कक्षेत येत आहेत.
रायगड सहकारी बँकेतून ठेवीदारांना 15 हजारांपर्यंत रक्कम काढता येईल. या दोन्ही बँकांचा परवाना रद्द केलेला नाही पण हे निर्बंध सहा महिने कायम असतील.आणि त्यांचा नियमित आढावा घेतला जाईल, असं रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com