संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी

संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी Palkhi of Saint Dnyaneshwar Mauli हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Restrictions issued by the Pune district administration on the background of Sant Dnyaneshwar Mauli’s Palkhi ceremony

संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध जारी

पुणे : संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. इंद्रायणी नदी प्रदूषित होईल अशा प्रकारचे कोणतेही व्यवसाय आळंदी आणि नजिकच्या परिसरात सुरु ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.संत ज्ञानेश्वर माउलींची  पालखी  Palkhi of Saint Dnyaneshwar Mauli हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

नदी आणि नदीकाठच्या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये, पालखी सोहळ्यासाठी येणारे वारकरी आणि भाविकांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याची खात्री करावी, कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार असल्यास आळंदीत येण्याचं टाळावं, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, उद्या सोमवारी आणि परवा मंगळवारी देहू तसंच आळंदीतून निघणाऱ्या आषाढी पायी वारीच्या ड्रोन द्वारे चित्रीकरणावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं बंदी घातली आहे. अचानक येणाऱ्या ड्रोनमुळे भविकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.

हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *