सेमीकंडक्टर तंत्रज्ञान निर्यातीवर बंधनं घालण्याची जपानची शक्यता

Japan likely to impose restrictions on semiconductor technology exports

सेमीकंडक्टर तंत्रज्ञान निर्यातीवर बंधनं घालण्याची जपानची शक्यता

सेमीकंडक्टर तंत्रज्ञान लष्करी कामांमध्ये वापरण्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं जपान त्याच्या निर्यातीवर बंधनं घालण्याची शक्यता आहे. जपान टाईम्सनं सरकारी सूत्रांचा हवाला देत याबाबत अधिक माहिती दिली असून पंतप्रधान फुमीओ किशिदा यांच्या नेतृत्वाखालील सरकार परदेशी चलन आणि निर्यात अर्थात परदेशी व्यापार या अनुषंगाने याविषयी सध्या लागू असलेल्या अध्यादेशात काही बदल आणि सुधारणा करण्याबाबत विचार विनिमय करणार आहे.

सध्याच्या अध्यादेशानुसार, सेमीकंडक्टरशी संबंधित काही उत्पादनं आणि तंत्रज्ञानाच्या निर्यातीसाठी अर्थमंत्रालय तसंच व्यापार आणि उद्योग मंत्रालय यांची अनुमती आवश्यक आहे. अमेरीकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाबाबत चीनवर काही नियामकीय निर्बंध लागू केले होते. त्या पार्श्वभूमीवर जपाननं हे पाऊल उचललं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *