Results of Civil Service Main Examination 2021 announced.
नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली : यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चे निकाल काल केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केले.
ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी काल आयोगानं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
यानंतर या विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा आणि गट अ आणि गट ब मधल्या इथर केंद्रीय सेवांसाठी मुलाखत होणार आहे.
येत्या ५ एप्रिलपासून आयोगाच्या नवी दिल्लीतल्या कार्यालयात या विद्यार्थ्यांच्या मुलाखतींना सुरुवात होईल असं आयोगानं कळवलं आहे.