UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर

Results of UPSC Civil Service Examination 2021 announced

UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर

नवी दिल्ली : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. उमेदवार त्यांची पात्रता स्थिती तपासण्यासाठी upsc.gov.in वर जाऊ निकाल पाहू शकतात.Union Public Service Commission Examination. हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून त्यानंतर अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारमधल्या गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या नावाची शिफारस UPSC नं केली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेसाठी १८०, परराष्ट्र सेवेसाठी ३७ आणि पोलिस सेवेसाठी २०० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी जानेवारी मुख्य परीक्षा आणि एप्रिल-मे महिन्यात मुलाखती झाल्या होत्या.

UPSC CSE अंतिम निकाल मुख्य मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी फेऱ्यांचे गुण एकत्रित करून प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेचा निकाल 17 मार्च रोजी जाहीर करण्यात आला, यासाठी जानेवारी मुख्य परीक्षा आणि एप्रिल-मे महिन्यात मुलाखती झाल्या होत्या.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा  परीक्षा 2021 उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशांमध्ये म्हटले आहे;

 

“नागरी सेवा परीक्षा 2021 उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना भारताच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाच्या प्रसंगी  आपली प्रशासकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या या तरुणांना माझ्या शुभेच्छा.”

 

“नागरी सेवा परीक्षा जे उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांचा अपेक्षाभंग मी पूर्णपणे जाणतो परंतु मला हे देखील माहीत आहे की हे असामान्य तरुण ज्या क्षेत्रात काम करतील तिथे आपला ठसा उमटवतील आणि देशाचा गौरव उंचावतील. त्यांना माझ्या शुभेच्छा.”

सर्वोच्च 100 नागरी सेवा विजेत्यांपैकी नऊ केरळमधील आहेत. दिलीप कैनिक्कारा २१व्या क्रमांकावर आहे. चेन्नई आयआयटी मध्ये पदवी घेतल्याला, दिलीपने सांगितले की हा त्याचा तिसरा प्रयत्न आहे. मागच्या वेळी त्याला भारतीय वनसेवा मिळाली होती आणि आता तो प्रशिक्षण घेत आहे आणि उच्च श्रेणी मिळविण्यासाठी तो पुन्हा परीक्षेला बसला.

“अखेर कष्टाचे फळ मिळाले. मला आयएएसमध्ये सामील व्हायचे आहे म्हणूनच मी पुन्हा परीक्षेला बसलो. मला समाज आणि देशाची सेवा करायला आवडेल,” तो म्हणाला. त्याने सांगितले की IIT मधून पदवी घेतल्यानंतर त्याने सॅमसंगमध्ये दोन वर्षे काम केले आणि 2018 मध्ये आपली नागरी सेवा स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली.

UPSC 2021 च्या अंतिम निकालात ऐश्वर्या वर्माने चौथे स्थान पटकावले

उज्जैन येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या वर्माने UPSC नागरी सेवा परीक्षेत चौथा क्रमांक पटकावला, ज्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. तिचे कुटुंब सध्या उत्तर प्रदेशातील बरेली येथे वास्तव्यास आहे.

वर्मा, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा पदवीधर विद्यार्थी, नवी दिल्लीत मागील चार वर्षांपासून यूपीएससीसाठी शिकत होती

यूपीएससी’ परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

प्रशासकीय कारकिर्दीसाठी यशस्वी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा हे यश तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ -उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या निकालात मराठी मुला-मुलींच्या वाढलेल्या टक्क्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळालेले यश हे तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ आहे.

प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना यापुढच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कल्याण आणि व्यापक देशहित लक्षात घेऊनच आपण निर्णय घ्याल, असा मला विश्वास आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच्या या प्रवासात तुम्हाला साथ दिलेल्या गुरुजनांचे, पालकांचे,  मार्गदर्शकांचे, मित्रांचे,  हितचिंतकांचेही मी यानिमित्ताने अभिनंदन करतो.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या राज्यातील शासनाच्या प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांचेही यामध्ये मोलाचे योगदान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *