पुणे येथे तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त

Directorate of Revenue Intelligence महसूल गुप्तचर संचालनालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

RI seizes smuggled Fake Currency Notes at Pune

डीआरआयने पुणे येथे तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या

पुणे : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दिलेल्या  विशिष्ट माहितीच्या आधारे  पुणे प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा  प्रकरणी  गुन्हा नोंदवला आहे.Directorate of Revenue Intelligence महसूल गुप्तचर संचालनालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने बुधवारी  (12 ऑक्टोबर 2022) ही कारवाई करण्यात आली. अधिकार्‍यांच्या पथकाने त्वरीत कारवाई करत  खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले.

प्रत्येकी 500/- रुपये मूल्य असलेल्या एकूण 400  भारतीय बनावट चलनी नोटा ज्याचे दर्शनी मूल्य 2 लाख रुपये आहे, त्या सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या.

तसेच, तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा पुरवठ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.  या प्रकरणी वर नमूद केलेल्या तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *