The World Health Organization has warned that there is a risk of increasing the incidence of measles at the global level
जागतिक स्तरावर गोवराचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
जिनिव्हा : कोविड-१९ काळातल्या परिस्थितीमुळे गोवर लसीकरणाकडे काहीसं दुर्लक्ष झालं असून त्यामुळं आता जागतिक स्तरावर गोवराचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकातील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागानं प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालात म्हटलंय की ,कोविड साथीमुळे गेल्या वर्षी सुमारे चार कोटी मुलांचा गोवर लशीचा डोस हुकला.
जागतिक आरोग्य संघटनेचे गोवर विषयक तज्ज्ञ पॅट्रिक ओ’कॉनर यांनी सांगितलं की,गोवराची लागण होण्याचं प्रमाण अद्याप गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे याबाबत ठोस कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे.
आगामी वर्ष-दोन वर्षांचा काळ अत्यंत आव्हानात्मक असणार आहे,असंही ते म्हणाले. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच गोवराची लागण होण्याची प्रकरणं समोर येऊ लागली असून आफ्रिकेत याचं प्रमाण चिंताजनक आहे.
२०२१ मध्ये जगभरात गोवराचे अंदाजे ९० लाख रुग्ण आढळले, तर एक लाख २८ हजार जणांचा मृत्यू झाले. २२ देशांमध्ये याचा उद्रेक झाल्याचे दिसून आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
गोवराचा विषाणू हा सर्वात वेगानं संसर्ग पसरवणाऱ्या विषाणूंपैकी एक असला तरी लसीकरणाद्वारे त्याचा धोका टाळता येऊ शकतो. परंतु यासाठी ९५ टक्के लोकसंख्येचं लसीकरण आवश्यक आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com