अंधेरी पूर्व विधानसभा  पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके सुमारे ७७ टक्के मतांसह विजयी

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

Rituja Latke won the Andheri East Assembly Constituency by-election with about 77 percent votes

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके सुमारे ७७ टक्के मतांसह विजयी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. त्यांना ७६ पुर्णांक ७८ शतांश टक्के मतं मिळाली. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच ऋतुजा लटके आघाडीवर होत्या.Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

मतमोजणीच्या १९ फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीअखेर एकूण ८६ हजार १९८ पैकी ६६ हजार २४७ मतं लटके यांना मिळाली. टपाली मतदानाच्या मोजणीत ३९४ पैकी २८३ मतं लटके यांना मिळाली. त्याखालोखाल नोटाला एकूण १२ हजार ८०६ मतं मिळाली आहेत.

ऋतुजा लटके यांचे पती शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. भाजपा उमेदवारनं माघार घेतल्यानंतर ७ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले होते. इतर उमेदवारांमधे टपाली मतदानासह राजेश त्रिपाठी यांना १ हजार ५७१, निना खेडेकर यांना १ हजार ५३१, बाला नाडार १ हजार ५१५, फरहाना सय्यद १ हजार ९३, मनोज नायक ९००, तर मिलिंद कांबळे यांना ६२४ मतं मिळाली आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *