ऋतुजा लटकेंचा विजयाचा मार्ग मोकळा! भाजपाची माघार

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

Rituja Latke’s way to victory!

ऋतुजा लटकेंचा विजयाचा मार्ग मोकळा!

मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

मुंबई: मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे.Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजपनं मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. तर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता अचानक भाजपनं निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे

दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निवडणूक लढवत असेल तर निवडणूक लढवू नये अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. तशीच भूमिका भाजपनं घ्यावी, असं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं.

भाजपकडूवन याबाबत बैठक घेण्यात आली आणि बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे उमेदवार मुरली पटेल माघार घेत असल्याची घोषणा केली.

भाजप उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे सांगितले की, ‘भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेत आहोत, तसेच मुरजी पटेल  अपक्षही निवडणूक लढणार नाहीत.

ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

“निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता बिनविरोध झाल्यानं सगळ्यांचे आभार मानते. गेले काही दिवस माझ्यासोबत प्रचारासाठी धावपळ करत होते, त्या सगळ्यांचे आभार. माझे पती रमेश लटके यांचे सर्वपक्षीयांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय असेल”, असं ऋतुजा लटके यांनी सांगितलं.

“हे भाजपला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलं.

या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलं होत. या पार्श्वभुमीवर भाजपानं आज या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *