RK Laxman’s works should be seen by the new generation – Guardian Minister Chandrakantada Patil
आर के लक्ष्मण यांच्या कलाकृती नव्या पीढिने नक्कीच पाहाव्यात – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
आर के लक्ष्मण आर्ट गॅलरीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट
पुणे: प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बाणेर येथील आर्ट गॅलेरीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची पाहणी केल्यानंतर, सदर दालन विद्यार्थ्यांनी आणि नव्या पीढिने पाहिलेच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आरके लक्ष्मण म्हटलं की, लगेच डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या कुंचल्यातून साकारलेला ‘कॉमन मॅन’! घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे आजही सर्वांच्या मनात घर करून आहे.
आर के लक्ष्मण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर येथे आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी उभारण्यात आली असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज या गॅलेरीला सदिच्छा भेट दिली.
यावेळी आरके लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अजरामर तत्कालीन राजकीय तथा सामाजिक कलाकृती न्याहाळताना अनेक जुन्या आठवणींना पालकमंत्र्यांनी उजाळा दिला. तसेच, आर्ट गॅलरीच्या मालगुडी डेज’चाही यावेळी पालकमंत्र्यांनी आस्वाद घेतला.
आरके लक्ष्मण यांच्या सारखा व्यंगचित्रकार पुन्हा होणे नाही, असे मत व्यक्त करतानाच आर्ट गॅलरीतील कलाकृती नव्या पीढिने विशेष करुन विद्यार्थ्यांनी पाहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुणेच नव्हे तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ही गॅलेरी मोफत असणार आहे.
तरुण पीढिलाही आरके लक्ष्मण यांच्या कलाकृतींची ओळख व्हावी; यासाठी गॅलेरीने आकारलेले १५० शुल्क ५० रुपयेच ठेवण्याचा आग्रह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आर्ट गॅलरीच्या प्रमुख उषाताई लक्ष्मण यांना केला. उषाताई लक्ष्मण यांनी ही माननीय पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ५० रुपये शुल्क करण्यास मान्यता दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com