महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, त्यांना स्वत:चे निर्णय घेऊ दिले पाहिजे

Rashtriya Swayamsevak Sangh Sarsangchalak Mohan Bhagwat राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

RSS Chief Mohan Bhagwat stresses on need to empower women with the freedom to make their own decisions

महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे,असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचं विजयादशमी मेळाव्यात प्रतिपादन

नागपुर : महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, त्यांना स्वत:चे निर्णय घेऊ दिले पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपुरमध्ये रेशीमबाग मैदानावर पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.Rashtriya Swayamsevak Sangh Sarsangchalak Mohan Bhagwat राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

ते म्हणाले, योग आणि व्यायामाचा सराव केला पाहिजे आणि वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक आरोग्याच्या सवयी विकसित केल्या पाहिजेत. मातृभाषेतील शिक्षणाला चालना देण्यासाठी धोरण आखले पाहिजे, असे मत भागवत यांनी मांडले.

विद्यार्थ्यांनी चांगला माणूस बनला पाहिजे, त्यांच्यात देशभक्ती रुजवली पाहिजे आणि ते सुसंस्कृत नागरिक बनले पाहिजेत, या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरणाचे त्यांनी स्वागत केले.

एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आणि पद्मश्री संतोष यादव यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. आपल्या भाषणात भागवत यांनी, नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती, अर्थव्यवस्था, धार्मिक हिंसाचार या सर्व मुद्यांवर भाष्य केलं.

देशातले विद्यार्थी हे देशभक्त आणि उत्तम नागरिक बनण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन संस्कारासोबतच घरातले तसंच सामाजिक संस्कार होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आरोग्य सेवेच्या परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि नफेखोरीमुक्त अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं संघाने सरकारला सुचवल्याचं भागवत यांनी सांगितलं.

सरकारने उद्योगशीलतेला प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार प्रशिक्षणाच्या विकेंद्रित योजना राबवण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं.

जे सनातन संस्कृतीत जीवन जगतात त्यांच्यामध्ये सृजन भाव निर्माण होतो, ही संस्कृती चांगल्या आरोग्यासाठी प्रेरित करते असं मत पद्मश्री संतोष यादव यांनी यावेळी व्यक्त केलं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *