प्रविण बांदेकर आणि प्रमोद मुझुमदार यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Sahitya Akademi Award साहित्य अकादमी पुरस्कार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

This year’s Sahitya Akademi Award was announced to Pravin Bandekar and Pramod Mazumdar

प्रविण बांदेकर आणि प्रमोद मुझुमदार यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला मराठीतील सर्वोत्तम कलाकृतीचा तर

‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. Sahitya Akademi Award साहित्य अकादमी पुरस्कार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

देशातल्या २३ भाषांमधल्या ८ साहित्य प्रकारांच्या २३ पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. एक लाख रूपये रोख, ताम्रपट आणि महावस्त्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. बंगाली भाषेतला पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येईल असं अकादमीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

अनुवादासाठीच्या पुरस्कारांमध्ये प्रमोद मुजुमदार यांच्या ‘सलाख्याचे प्रदेशः शोध सहिष्णु भारताचा’ या पुस्तकाचा समावेश आहे. सबा नकवी यांच्या ‘इन गुड फेथ’ या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. पन्नास हजार रूपये रोख आणि ताम्रपट असं अनुवादासाठीच्या पुरस्काराचं स्वरूप आहे. अनुवादासाठी आज १७ पुस्तकांची निवड जाहीर करण्यात आली असून ७ भाषांमधले पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येतील, असं अकादमीनं पत्रकात म्हटलं आहे.

प्रवीण बांदेकर यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील प्रसिध्द लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2022 साठी जाहीर झाला.

त्यांच्या कविता, कादंबरी, ललित लेखन, बाल साहित्य व अनेक समीक्षा प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी महाविद्यालयीन दिवसांपासून लेखनाला सुरूवात केली असून त्यांची चाळेगत कादंबरी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सोलापूर विद्यापीठ येथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

गेल्या 20-25 वर्षांपासून लेखन कार्य करत आलेल्या श्री. बांदेकर यांनी त्यांच्या कादंबरीत कोकणातील विविध सामाजिक प्रश्न, मानवी नात्यातील गुंते, धार्मिक व राजकीय अनुभव बाहुल्यांच्या माध्यमातून कथन केले आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व साहित्याच्या माध्यमातून कथन केलेले अनुभव, वेगवेगळ्या समस्या जास्तीत-जास्त लोकांसमोर येतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

प्रमोद मुजुमदार यांच्या लेखनकार्याविषयी

सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादित पुस्तकासाठी प्रमोद मुजुमदार यांना आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला.

मूळचे पुण्याचे असलेले श्री. प्रमोद श्रीनिवास मुजुमदार यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. वर्ष 1999 पासून मुक्त पत्रकार म्हणून कारकीर्द आरंभ करत, त्यांनी दैनिक महानगर, साप्ताहिक कलमनामा या नियतकालिकांत पंधरा वर्षे लिखाण केले व आरोग्य, शहरीकरण आणि पर्यावरण इ. विषयांवर स्तंभ लेखन करत आले आहेत. सध्या ‘सलोखा संपर्क गटात’ त्यांचा सहभाग आहे. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत. अस्तित्वाचे प्रश्न, गुजरात पॅटर्न, आरोग्याचा बाजार, (अनुवाद आणि रूपांतर), सलोख्याचे प्रदेश (अनुवाद), दास्ताँ-ए-जंग सारखी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ हे पुस्तक, श्री मुजुमदार यांनी इंग्रजी पुस्तक, ‘इन गुड फेथ’ या मूळ पुस्तकाचा मराठी भाषेत केलेला अनुवाद आहे. प्रख्यात लेखिका श्रीमती सबा नक्वी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. श्रीमती नक्वी यांनी कश्मीर ते कन्याकुमारी व मणीपूर ते महाराष्ट्रात असलेल्या सार्वजनिक, धार्मिक स्थळांना व लोकप्रिय दैवतांचे दर्शन घेवून, मंदिरांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांचा सार्वत्रिक सलोख्यासाठी पुस्तकात इतिहास मांडला आहे. या पुस्तकाचा अनुवाद श्री मुजुमदार यांनी केला असून त्याबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *