अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी ‘सखी-एक थांबा केंद्रा’शी संपर्क साधण्याचे आवाहन

हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या हडपसर न्युज Hadapsar Crime News Hadapsar Marathi News Hadapsar News

An appeal to abused women and girls to contact the ‘Sakhi-Ek Thamba Kendra’

अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी ‘सखी-एक थांबा केंद्रा’शी संपर्क साधण्याचे आवाहन

अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी आवश्यक ती मदत व मार्गदर्शनहडपसर क्राइम न्यूज 
हडपसर मराठी बातम्या 
हडपसर न्युज 
Hadapsar Crime News
Hadapsar Marathi News
Hadapsar News

पुणे : कौटुंबिक छळ, बलात्कार, लैंगिक छळ, देहविक्री, अँसिड हल्ला, बालविवाह, सायबर गुन्हा, अपहरण व इतर प्रकरणांमधील अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन मिळविण्याकरीता सखी-एक थांबा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सखी एक थांबा केंद्रामार्फत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत विविध प्रकारची मदत अत्याचारपिडीत महिला व बालिकांना देण्यात आली आहे. यामध्ये २२५ महिला व बालिकांना विधी सेवा प्राधिकरणाचे विधी सहाय्य व सल्ला, ७० जणींना वैद्यकीय उपचारासाठी मदत व मार्गदर्शन, पोलीस कारवाईसाठी मदत व मार्गदर्शन ८७ जणींना, ४४६ जणींना मानसिक समुपदेशन, १५२ महिला व १८ बालिकांना सखी – एक थांबा केंद्र येथे तात्पुरता आश्रय पुरविला असून ८३ महिला व बालिकांना इतर सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत.

सखी-एक थांबा केंद्र क्र. १, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, मुंढवा, पुणे- ३६ येथील शासकीय मुलींचे निरीक्षणगृह, विशेषगृह, बालगृह, (संपर्क क्रमांक ८१७७९५५१८१) येथे स्थापन करण्यात आले आहे. तरी अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी मदतीसाठी सखी-एक थांबा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *