भांडारकर संस्थेच्या “समवसरण” ॲम्फी थिएटरचे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न 

Inauguration of Bhandarkar Sanstha’s “Samvasaran” Amphitheater by Nitin Gadkari

भांडारकर संस्थेच्या “समवसरण” ॲम्फी थिएटरचे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या “समवसरण” या ॲम्फी थिएटरचे उद्घाटन आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरीNitin Gadakari हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त राहुल सोलापूरकर, संजय पवार, सदानंद फडके व सुधीर वैशंपायन उपस्थित होते. सर्वांचे स्वागत प्रदीप रावत यांनी केले तर भूपाल पटवर्धन यांनी आभार मानले. डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी गडकरी म्हणाले की, भारतीय संस्कृतीला जोडणारे अनेक धागे आहेत. उपासना पद्धती वेगळी असली तरी भक्ती एकच आहे, त्यामुळे विविधता असूनही आपण एक आहोत. आपण गरीब असलो तरी आपली कुटुंब व्यवस्था मूल्याधिष्ठित आहे. आपल्या धर्म, जातींमध्ये निष्कारण गैरसमज आहेत, ते दूर व्हायला हवेत. आपण त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. चांगली कामे होत आहेत, त्यासाठी लोकाश्रय मिळायला हवा.

यावेळी फिरोदिया यांनी, अशा प्रकारच्या ॲम्फी थिएटरच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी आणि उद्देश याबद्दल माहिती दिली. या अ‍ॅम्फी थिएटरला समवसरण दिलेल्या नावाबद्दल त्यांनी सांगितले की, साम म्हणजे समान आणि अवसर म्हणजे संधी, म्हणजेच समान संधी.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, सर्वांना जोडणारी भारतीय संस्कृती आहे. त्यातील मूल्यांकडे आपण पाहिले पाहिजे. आपल्या परंपरा आणि जीवन पद्धती यांचा विसर पडलाय, त्या आता पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. भारतातील साहित्य संपदा भरपूर आहे, ती जाणून घेत आत्मसात केली पाहिजे. भांडारकर संस्थेत यासाठी सुयोग्य वातावरण आहे. त्याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा.

पुण्याच्या अगदी मध्यभागी असलेल्या या अनोख्या खुल्या प्रेक्षागृह व रंगमंच असलेल्या “समवसरण” ॲम्फी थिएटरचे उद्घाटन करण्याचा आजचा अतिशय शुभ दिवस आहे. आज महावीरांची २६२१ वी जयंती आहे, तसेच बैसाखी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील आहे. “समवसरण” ॲम्फी थिएटर हे सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी उत्तम आहे. या व्यासपीठाचा मुख्य भाग 70 फूट रुंद आणि 50 फूट लांब आहे आणि यात सुमारे 700 व्यक्तींसाठी क्षमता आहे, दुसरा भाग 60 फूट रुंद आणि 25 फूट लांब आहे, ज्याची क्षमता 300 जणांची आहे. तसेच 30 ते 40 व्यक्तींच्या लहान गटांसाठी कार्यशाळा/वर्ग आयोजित करण्यासाठी स्वतंत्र भाग देखील येथे आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या जाणकारांसाठी एक स्वतंत्र जागा देखील तयार करण्यात आली आहे. यात कलाकारांसाठी विशेष बैठक व्यवस्था आहे. या “समवसरण” ॲम्फी थिएटरला श्री फिरोदिया ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अभय फिरोदिया यांनी सुमारे रु. 7 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *