Sane Guruji’s thoughts should imbibe
साने गुरूजींचे विचार आत्मसात करावेत
– प्राचार्य दत्तात्रय जाधव.
हडपसर : कोकणच्या भव्य सागरात अनेक नररत्न जन्माला आली.त्यांनी केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले. त्यापैकीच एक थोर स्वातंत्र्यसेनानी,मुलांचे आवडते शिक्षक व श्रेष्ठ लेखक व कवी म्हणजे पांडूरंग सदाशिव साने हे होत.
साने गुरूजी हे मातृहदयाचे कवी होते. त्यांनी मुलांसाठी श्यामची आई नावाची कादंबरी लिहिली.साने गुरूजी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढयात सहभाग घेतला व तुरूंगवासही भोगला. लोकशिक्षणाचेही त्यांनी कार्य केले. उत्तमोत्तम पुस्तके व कविताही लिहिल्या. त्यांनी साधना साप्ताहिकाची स्थापना केली.अशा महापुरुषांच्या विचारांचे बोट धरून आपण जीवनात मार्गक्रमण केले पाहिजे.
साने गुरुजींचे विचार आपण आत्मसात करावेत असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे साने गुरूजी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
युवराज मांडवगणे या विद्यार्थ्याने साने गुरूजी यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कमल मोरमारे यांनी शिक्षक मनोगतात साने गुरूजी यांच्या समग्र जीवनाची माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,मिनाक्षी राऊत सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी कुंभार यानी केले.सूत्रसंचालन कोमल जायभाय यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com