Sanjay Raut’s custody extended by 4 days in Patra Chaal case
पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या कोठडीत ४ दिवस वाढ
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने आज राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए न्यायालयानं त्यांना आजपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात ठेवण्याचा आदेश दिला होता.
संजय राऊत यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुढील चार दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. त्यावेळी सुरुवातीला ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र त्यावेळी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी दिली.
ही कोठडी संपल्यानं राऊत यांना ईडीनं आज पुन्हा न्यायालयात हजर केलं आणि राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप केला. मात्र तपासात चांगली प्रगती झाली असून, येत्या सोमवारपर्यंत चौकशी पूर्ण करावी, असं न्यायालयानं सांगितलं.
ईडीच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळ या पुनर्विकासातील अनियमितता आणि आर्थिक मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित आहे. संजय राऊत यांनी मात्र आपल्यावरील आरोप अस्पष्ट असून ते राजकीय सूडबुद्धीने केल्याचा दावा केला आहे.
संबंधीत बातमी
पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com