सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन

Sardar Vallabhbhai Patel सरदार वल्लभभाई पटेल हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Exhibition of photographs based on the life of Sardar Vallabhbhai Patel

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: राष्ट्रीय एकता दिवसही साजरा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.  Sardar Vallabhbhai Patel सरदार वल्लभभाई पटेल हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते मुख्य इमारती मधील सरस्वती सभागृहात भरवलेल्या या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे, जनसंपर्क विभागाचे सहायक कुलसचिव डॉ.अजय ठुबे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथही घेण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याच दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

या छायाचित्र प्रदर्शनात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट ४० पोस्टर्सच्या माध्यमातून उलगडण्यात आला. दिवसभरात अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *