Sashakti Digital Van’ to promote women entrepreneurship
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’
– कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई : महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सशक्ती डिजिटल व्हॅनचा’ शुभारंभ करण्यात आला.
मास्टरकार्ड ऍण्ड लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रमराबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या ३१ मार्चपर्यंत सुमारे ७ हजार ५०० महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंत्री श्री. लोढा यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com