Savitribai Phule laid the foundation of women’s education
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला
– प्राचार्य दत्तात्रय जाधव.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
हडपसर : अंगावर दगड -धोंडे-चिखल-गाळ झेलून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि शिकवण्याचे कार्य नेटाने चालू ठेवले. समाजाचा विरोध पत्करून महामानव महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात,भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले.सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळे बहुजन समाज शिक्षण प्रवाहात आला. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या खांद्याला- खांदा भिडवून शिक्षण,अस्पृश्यताउद्धार ,स्त्रीमुक्ती, समाजसेवा या क्षेत्रात काम केले. सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने स्त्रीशिक्षणाचा पाया घातला, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सुमित शिंदे,ऋषिकेश शिंदे,प्रतिक भगत,महेश हिंगोले,विश्वराज सूळ,अमेय नरूटे,आदेश पवार,तेजस कदम,तेजस ठाकरे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतात स्मिता पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर, सांस्कृतिक प्रमुख संगिता रूपनवर, सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिला गंधट यानी केले.सूत्रसंचालन सारिका टिळेकर यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com