Savitribai Phule Pune University offers free online credit courses
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत विनामूल्य ऑन लाईन क्रेडीट अभ्यासक्रम सुरु
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक बहुमाध्यम केंद्र (EMMRC) आणि Consortium for Educational Communication (CEC) यांच्या माध्यमातून विविध ऑनलाईन क्रेडीट अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेले आहेत.
हे अभ्यासक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वयम प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. हे सर्व अभ्यासक्रम विनामुल्य असणार आहेत. यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्वयम मार्फत परीक्षा घेऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि क्रेडीट गुण प्रदान करण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमांमध्ये खालील विषयांचा समावेश आहे आणि यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन प्रवेश घेत येणार आहेत.
फंडामेंटल ऑफ ऑफिस मॅनेजेंट अँड मेथड्स
इंडियन क्लासिकल डान्स – कत्थक
मायक्रो इकोनोमिक्स,
पर्सनालिटी डेव्हलमेंट, पर्सनालिटी डेव्हलमेंट अँड कम्युनिकेशन स्किल
यासाठी विद्यार्थ्यांना swayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी केल्यानंतर आपल्या आवडीच्या विषयाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व्हिडीओ लेक्चर पाहता येईल शिवाय त्या संदर्भातील इतर घटक ही पाहता येतील. याशिवाय विद्यार्थ्यांना दर आठवड्याला असाईनमेंट आणि क्वीज सबमिट करावे लागतील.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्वयम मार्फत परीक्षा घेण्यात येईल. यशस्वीरीत्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि क्रेडीट गुण प्रदान करण्यात येतील.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निर्णयानुसार पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ४० % अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावा अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com