SBI signs concession agreement for BSF employees
बीएसएफ कर्मचाऱ्यांसाठी एसबीआयची सवलत करारावर स्वाक्षरी
मुंबई : केंद्रीय सशस्त्र पोलीस मानधन पॅकेज योजनेच्या माध्यमातून बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या सध्या कार्यरत तसंच निवत्त कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलती असलेल्या सामंजस्य करारावर बीएसएफ आणि एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेनं आज स्वाक्षऱ्या केल्या.
वैयक्तिक आणि हवाई अपघात विमा संरक्षण, कामावर असताना झालेल्या मृत्यूसाठी तसंच कायमस्वरूपी दिंव्यागता यासाठी अतिरिक्त संरक्षण याची ग्वाही या करारातून मिळणार आहे. मुलांचं शिक्षण तसंच मृत कर्मचाऱ्याच्या मुलींचं लग्न यासाठीही हा करार पाठबळ देईल. निवृत्त कर्मचाऱ्यांचं वय विचारात न घेता ते अपघात विम्यासाठी पात्र ठरतील.
बीएसएफ कर्मचाऱ्यांसाठी बँक खात्यात झीरो बॅलन्सची सुविधा एसबीआयनं दिली असून त्यांना सेवा शुल्क माफ असेल. या करारानुसार गृह, कार, शिक्षण तसंच एक्स्प्रस क्रेडिट या सर्व वैयक्तिक कर्जांवर बॅंक त्यांना आकर्षक व्याजदर तसंच प्रक्रिया शुल्कावर सवलत देणार आहे.
देशाची आणि नागरिकांची सुरक्षा तसंच निस्वार्थी सेवा आणि राष्ट्रबांधणीसाठी त्यांनी दिलेलं योगदान लक्षात घेऊन बॅंकेनं त्यांच्यासाठी सर्वोत्तम पाठिंबा द्यायचा प्रयत्न केल्याचं एसबीआय अध्यक्ष दिनेश खारा यांनी यावेळी सांगितलं.
Hadapsar News Bureau.