स्कूल बस चालकाचं धक्कादायक कृत्य, पुण्यातील शाळकरी मुलीवर अत्याचार

School bus driver’s shocking act of violence against a school girl in Pune

स्कूल बस चालकाचं धक्कादायक कृत्य, पुण्यातील शाळकरी मुलीवर अत्याचार

पुण्यातील शाळकरी मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत त्वरित चौकशी आणि कार्यवाहीचे निर्देश – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे /मुंबई : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाने शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बसचालकाने विद्यार्थिनीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

पीडिता मुलगी आरोपीच्या स्कूल बसमधून शाळेतून घरी येत-जात असायची, त्यावेळत त्यांची चांगली ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने मुलीवर मार्च आणि जूनमध्ये तीन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने अल्पवयीन मुलीला ३ वेळा वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी नेऊन तिचावर बलात्कार केला. ही सर्व हकीकत मुलीने दोन महिन्यानंतर तिच्या आईला सांगितली आणि एकच खळबळ उडाली. घरच्यांनी तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहे.

त्वरित चौकशी आणि कार्यवाहीचे निर्देश

कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत कसोशीने तपास करून आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त यांना आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe Hadapsar News Hadapsar Latest News हडपसर मराठी बातम्या
File Photo

या अनुषंगाने वाहतूक पोलीस व पुणे परिवहन विभाग यांनी संयुक्तरित्या स्कूल बसेसमध्ये नेमण्यात आलेले परिचारक ,वाहनचालक व मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करावी. या नेमणुकाबाबत काय कार्यवाही झाली, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून राज्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागात व शालेय बस वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे तसेच प्रत्येक बसमध्ये महिला परिचारक नेमणे याबाबत माहिती देण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी या पत्राद्वारे परिवहन विभागाला दिले आहेत. स्त्री आधार केंद्राच्या वतीने या पीडितेची विचारपूस करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तिची आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोक्सो अॅक्टअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *