वागशीर’- प्रोजेक्ट-75 च्या सहाव्या स्कॉर्पीन पाणबुडीचे आज झाले जलावतरण

‘Vagsheer’ – the sixth Scorpene Submarine of Project-75 launched today

वागशीर’- प्रोजेक्ट-75 च्या सहाव्या स्कॉर्पीन पाणबुडीचे आज झाले जलावतरण

वागशीरच्या जलावतरणाने, भारताचे पाणबुडी निर्माते राष्ट्र म्हणून स्थान आणखी मजबूत झाले

मुंबई : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (MDL) भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात गौरवशाली वाटचाल सुरू ठेवली आहे. याच परंपरेत आज प्रकल्प-75 ची सहावी स्कॉर्पीन पाणबुडी ‘वागशीर’चे जलावतरण प्रमुख पाहुणे श्रीमती वीणा अजय कुमार, संरक्षण सचिव डॉ. अजयकुमार यांच्या हस्ते झाले. यानंतर, एका वर्षभराहून अधिक काळ विविध कठोर आणि व्यापक चाचण्यातून ही पाणबुडी जाणार आहे. जेणेकरुन पूर्णपणे पात्र आणि सक्षम अशी लढाऊ पाणबुडी तैनात करता येईल.Vagsheer- the sixth Scorpene Submarine of Project-75 launched today

स्कॉर्पीनमध्ये वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उत्कृष्ट स्टेल्थ वैशिष्ट्ये (जसे की प्रगत ध्वनिक शोषण तंत्र, कमी किरणोत्सारी आवाज पातळी, हायड्रो-डायनॅमिकली ऑप्टिमाइझ केलेले आकार इ.) आणि अचूकतेचा वापर करून शत्रूवर अचूक शस्त्रांनी हल्ला करण्याची क्षमता सुनिश्चित केली आहे.

हा हल्ला टॉर्पेडो आणि ट्यूब लाँच केलेल्या जहाजरोधी क्षेपणास्त्रांनी, पाण्याखाली किंवा पृष्ठभागावर केला जाऊ शकतो.  तिच्या वैशिष्ट्यपूर्ण पाण्याखालील क्षमतेकडे विशेष लक्ष दिल्याने या शक्तिशाली व्यासपीठाची क्षमता वाढली आहे.  ही स्टिल्थ वैशिष्ट्ये त्याला एक अभेद्यता देतात, ही इतर पाणबुड्यांच्या तुलनेत अतुलनीय ठरते.

हिंद महासागरातील खोल समुद्रात राहणाऱ्या शिकारी सँड फिश या प्राणघातक माशाच्या नावावरून वागशीर हे नाव देण्यात आले आहे.  पहिली पाणबुडी वागशीर,  ex-Russia, 26 डिसेंबर 1974 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली होती आणि जवळजवळ तीन दशकांच्या देश सेवेनंतर 30 एप्रिल 1997 रोजी निवृत्त करण्यात आली होती. नाविक परंपरेनुसार, त्याच नावाने ही नवीन पाणबुडी आहे.  माझगाव डॉकद्वारे, नव चैतन्याने  भारलेला वागशीर, पुन्हा एकदा खोलवर मुसंडी मारणारा अतिशय शक्तिशाली शिकारी, आपल्या देशाच्या विशाल सागरी हितांचे रक्षण करणार आहे..

स्कॉर्पीन पाणबुडी विविध प्रकारच्या मोहिमा राबवू शकते.  पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, भूसुरुंग पेरणे, परिसराची टेहळणी इ. यांचा यात समावेश आहे. पाणबुडीची रचना सर्व प्रकारच्या कार्यवाहीसाठी केली आहे. नौदलाच्या इतर घटकांसह परस्पर सहकार्य दर्शवणारी ही रचना आहे. ही एक शक्तिशाली पाणबुडी आहे.

वागशीरच्या जलावतरणाने, भारताने पाणबुडी निर्माते राष्ट्र म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे आणि MDL ने ‘युद्धनौका आणि पाणबुडी निर्माण करणारे राष्ट्र’ म्हणून आपल्या प्रतिष्ठेपेक्षा अधिक काम केले आहे.  हे सरकारच्या सध्याच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने असलेल्या प्रयत्नांशी पूर्णपणे सुसंगत आहे.

माझगाव डॉक इथे चालू असलेल्या प्रोजेक्ट-75 स्कॉर्पीन कार्यक्रमातील कलवरी, खांदेरी, करंज आणि वेला या चार पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत.  पाचवी पाणबुडी वगीर सागरी चाचण्यांच्या टप्प्यात आहे, तर सहावी आणि शेवटची पाणबुडी जलावतरणानंतर सागरी चाचण्या पार पाडेल.

संरक्षण उत्पादन विभाग (MoD) आणि भारतीय नौदलाच्या सक्रिय प्रोत्साहनाशिवाय तसेच त्यांच्या बिनशर्त पाठिंब्याशिवाय, स्कॉर्पीन प्रकल्पाला सुधारणा आणि त्याच्या बांधकामाच्या विविध टप्प्यांमध्ये सध्याची प्रगती साधता आली नसती.

उल्लेखनीय बाब म्हणजे, MDL ने 1992 – 1994 दरम्यान बांधलेल्या दोन SSK पाणबुड्या आज 25 वर्षांहून अधिक काळानंतरही सक्रिय सेवेत आहेत. माझगाव डॉक कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिकतेची आणि क्षमतेचीच ही साक्ष आहे.  MDL ने भारतीय नौदलाच्या चारही SSK वर्गाच्या पाणबुड्यांचे मध्यम रिफिट-कम-अपग्रेडेशन यशस्वीरित्या पार पाडून पाणबुडी रिफिटमध्ये कौशल्य प्राप्त केले.  ती सध्या पहिली SSK पाणबुडी INS शिशुमारचे मध्यम रिफिट आणि लाइफ सर्टिफिकेशन करत आहे.

राष्ट्रीय सागरी सुरक्षा आणि राष्ट्र उभारणीत MDL चे योगदान सध्या 03 मध्ये सुरू असलेल्या बांधकामासह P-15B विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयर्स आणि 04 क्र.  P-17A निलगिरी क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स इथे सुरू आहे. संवेदनशील तसेच वेळेत भविष्यातील आव्हानांची जाणीव असल्याने, MDL ने पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांसाठी एक व्यापक आधुनिकीकरण कार्यक्रम हाती घेतला आणि पूर्ण केला. 04 ड्रायडॉक, 03 स्लिपवे, 02 वेट बेसिन आणि कार्यशाळेचे साठ हजारांहून अधिक  चौरस मीटर क्षेत्रफळ, एकाच वेळी 10 कॅपीटल युद्धनौका आणि 11 पाणबुड्या बांधण्याची क्षमता यात आहे.

खरेतर, लिएंडर आणि गोदावरी क्लास फ्रिगेट्स, खुकरी क्लास कॉर्वेट्स, कोस्ट गार्ड ओपीव्ही, 1241 आरई क्लास मिसाईल बोट्स, दिल्ली आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर्स, शिवालिक क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स, एसएसके पाणबुड्या आणि त्याच्या पट्टयातील स्कॉर्पीन पाणबुडी, हे आधुनिक काळातील MDL चा इतिहास हा स्वदेशी युद्धनौका आणि भारतातील पाणबुडी बांधणीचा समानार्थी शब्द आहे.

हडपसर न्यूज ब्युरो (Hadapsar News Bureau)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *