Seminar on NAC- Concepts, Methods
नॅक- संकल्पना , पद्धती या विषयावर परिसंवाद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: डॉ.भूषण पटवर्धन यांनी उपस्थिती
पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय मुल्यांकन व मान्यता परिषद – संकल्पना , पद्धती’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अंतर्गत गुणवत्ता कक्ष आणि कर्वे इन्स्टिट्युट ऑफ सोशल सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर नॅक मुल्यांकन समजून घेण्याच्या दृष्टीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक परिसंवादात नॅकचे अध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन, आयसरचे डॉ.के पी.मोहनन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आर.एस. माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या शैक्षणिक परिसंवादात पुण्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य , महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता व्यवस्था समितीचे समन्वयक , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदाधिकारी व प्राध्यापक , माजी कुलगुरू यांना निमंत्रित करण्यात आले आहे .
राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता सुधार हेतूने या परिसंवादात महाविद्यालय मुल्यांकन संकल्पना व पद्धतीतील बदलाबाबत राष्ट्रीय स्तरावरील चर्चेला प्रारंभ होणार आहे .
हा परिसंवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील नामदेव सभागृहात दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात संपन्न होणार आहे अशी माहिती विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या संचालक डॉ.सुप्रिया पाटील यांनी दिली.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय प्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता समन्वयक यांनी नावनोंदणी खालील लिंकवर करावी.
https://forms.gle/Yjwz9EhFoHBrW2587
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com