राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन

Senior NCP leader Moreshwar Tembhurde passed away राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Senior NCP leader Moreshwar Tembhurde passed away

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन

Senior NCP leader Moreshwar Tembhurde passed awayराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे

नागपूर : राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते.आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून वरोरा विधानसभा मतदार संघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकून आमदार झालेले ॲड. टेमुर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताच शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय होते.

अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात त्यांनी दोनवेळी वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 1991 -95 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते. अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत होता मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले टेमुर्डे राजकिय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करत असते.

चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वरोरा-भद्रावती मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. टेंभुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांची विशेष ख्याती होती. वरोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यात मोरेश्वर टेंभुर्डे यांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन विस्तारण्याचे काम केले. त्यामुळे टेंभुर्डे यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

त्यांच्या इच्छेप्रमाणे मरणोत्तर त्यांचं पार्थिव शरीर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावं याकरिता वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *